smriti irani pawari video reaction 
देश

पावरी सोडा, हे बघा! पाकिस्तानी मुलीच्या पार्टी व्हिडिओवर स्मृती इराणींची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - सोशल मिडीयावर कधी काय व्हायरल होईल सांगला येत नाही. गेले काही दिवस पाकिस्तानची दनानीर मुबीर नावाच्या तरुणीचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही तरूणी 'ये हमारी कार है, ये हम है, और ये हमारी पावरी हो रही है',असं म्हणते.

पार्टी या शब्दाला ती पावरी म्हणते त्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले. पण या व्हिडीओमधील तिचा बोलण्याचा अंदाज हटके असल्याने भारतात विनोदी व्हिडीओ एडिट करणारा कलाकार यश राजमुखातेने या पाकिस्तानी मुलीचा व्हिडीओ म्युजिक वापरून एडिट केला. त्यामुळे हा व्हिडीओ ट्रेंड झाला.  पावरीचा ओरिजनल व्हिडीओ दानानीर मुबीन हीने 6 फेब्रुवारी रोजी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

पावरी व्हिडीओला प्रत्युत्तर म्हणून  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यश मुखातेने एडिट केलेला अभिनेत्री शहनाज गिलच्या डायलॉगचा व्हिडीओ स्मृती इराणी यांनी पोस्ट केला आहे. या व्हिडीओला सोशल मिडीयावर खूप लोकप्रिता मिळाली होती.

'जेव्हा तुम्ही पावरी व्हिडीओ पेक्षा आपला देसी असलेला टॉमी व्हिडीओला जास्त प्राधान्य देता. पावरी सोडा हे बघा, शहनाजच्या भावनांचा विचार करा' असे भन्नाट कॅप्शन या व्हिडीओला स्मृती इराणींनी दिले आहे. 

पाकिस्तानच्या या व्हिडीओला स्मृती इराणींनी भारतातील अभिनेत्रीचा व्हिडीओ पोस्ट करून प्रतिक्रिया दिली आहे. याआधी स्मृती इराणी यांनी रसोडे में कौन था व्हिडिओ एडिट केला होता तेव्हा त्यांनी व्हिडिओ शेअर करून 'बस अब यही रह गया था' असं विनोदी कॅप्शन दिले होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

SCROLL FOR NEXT